काँग्रेसने मातोंडकरांना दिलेली वागणूक निषेधार्हच: सत्यजीत तांबे

Thote Shubham

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी या प्रकरणी काँग्रेसमधीलच नेत्यांना खडेबोल सुनावले आहेत. मातोंडकर पक्षातल्या गटबाजीला कंटाळून सोडून गेल्या.

त्यांना काँग्रेसने जी वागणूक दिली, ती निषेधार्हच असल्याची टीका त्यांनी केली.मातोंडकर यांच्यासारखी अ‍ॅसेट गमावणे हे पक्षाला नुकसानकारक असल्याचे ते म्हणाले. तांबे म्हणाले, की उर्मिलाजींनी पक्ष जरी सोडला असला, तरी त्या दुसर्‍या कुठल्याही पक्षात जाणार नाहीत. त्या विचारधारेशी एकनिष्ठ असून विचारधारेशी तडजोड करणार नाहीत.

पक्षांतर्गत गटबाजी आहे आणि उर्मिलाजी फार राजकीय नसल्याने त्यांना हे सहन झाले नाही. त्यामुळे याकडे पक्षश्रेष्ठींनी लक्ष द्यावे.दरम्यान, युवक काँग्रेसने राज्यात 60 जागांची मागणी केली आहे. अनेक नगरपालिका, महानगरपालिका, स्थानिक स्वराज संस्थांमध्ये काम करणार्‍या युवकांना संधी देण्यात यावी, अशी मागणी पक्षश्रेष्ठींकडे केली असल्याचे तांबे म्हणाले.                                                                                                                                                                      

Find Out More:

Related Articles: