जबरदस्तीने जय श्रीरामचे नारे लावण्यास सांगणे हा हिंदू धर्माचा अपमान – कर्ण सिंह

frame जबरदस्तीने जय श्रीरामचे नारे लावण्यास सांगणे हा हिंदू धर्माचा अपमान – कर्ण सिंह

Thote Shubham

काँग्रेस नेते शशी थरूर यांच्या ‘द हिंदू वे: एन इंट्रोडक्शन टू हिंदुइज्म’ या नवीन पुस्तकाचा प्रकाशन सोहळा नुकताच दिल्ली येथे पार पडला. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कर्ण सिंह देखील उपस्थित होते. यावेळी बोलताना कर्ण सिंह म्हणाले की,

ज्येष्ठ नेते कर्ण सिंह हे दिल्लीमधील एका कार्यक्रमात बोलता एखाद्याला मिळून मारणे आणि त्याच्याकडून जबरदस्तीने जय श्रीरामचे नारे म्हणून घेणे हा केवळ हिंदू धर्माचाच नाही तर देवाचा देखील अपमान आहे.

कर्ण सिंह यांनी एका मॉब लिचिंग प्रकरणाचा देखील उल्लेख केला. यामध्ये एक मुस्लिम युवक तबरेज अंसारीला खांबाला बांधून मारण्यात आले होते. त्या युवकावर प्राणी चोरीचा आरोप करण्यात आला होता आणि त्याला जय श्री रामचे नारे देण्यास सांगण्यात आले होते.

कर्ण म्हणाले की, भगवान श्रीराम तर दयाळू होते. तुम्हाला वाटते का एखाद्या गरीबाला मारताना लोक त्यांचे (श्रीराम) नाव घेईल ?

कर्ण सिंह म्हणाले की, एखाद्याला जबरदस्तीने जय श्री राम म्हणायला लावणे हा हिंदू धर्माचा अपमान आहे. तबरेज अंसारी घटनेचा उल्लेख करत ते म्हणाले की, हे खरचं हिंदूत्व आहे का ?  मी रघूवंशी आहे. श्रीराम हे एक दयाळू देव होते. खरे हिंदूत्व मिठी मारते, अंतर कमी करते. युध्दाची स्थिती निर्माण करत नाही.

पुस्तक प्रकाशना दरम्यान शशी थरूर देखील म्हणाले की, लिचिंगच्या नावाखाली जे केले जात आहे ते हिंदू धर्माच्या सिध्दातांच्या विरोधात आहे.


Find Out More:

Related Articles:

Unable to Load More