‘संविधान निर्मात्यांना राम, कृष्ण आणि भगवद् गीतेमुळेच मिळाली प्रेरणा’ - रविशंकर प्रसाद

Thote Shubham

‘मोदी सरकारच्या काळातील कायद्याच्या सुधारणा’ या विषयावर मुंबई विद्यापीठाच्या सभागृहात बोलताना केंद्रीय कायदेमंत्री रविशंकर प्रसाद यांनी राम, कृष्ण आणि भगवद गीतेचा उल्लेख संविधानाच्या मूळ प्रतीत असून, यातूनच संविधान निर्मात्यांना प्रेरणा मिळाली असल्याचे वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

संविधानाची मूळ प्रत आपल्याकडे असल्याचा दावाही आपल्या भाषणात रविशंकर प्रसाद यांनी केला. तसेच त्यांनी या मूळ प्रतीच्या सुरुवातीलाच प्रभू राम श्रीलंकेतून अयोध्येत परत आल्याचे चित्र रेखाटले असल्याचे सांगितले. तसेच, भगवद गीतेचा सार संविधानाच्या आतील पानांत असून, श्रीकृष्णाचे त्यावर चित्र असल्याचे त्यांनी सांगितले.

राम-कृष्ण आणि सीतेसह राणी लक्ष्मीबाई, महाराणा प्रताप, छत्रपती शिवाजी महाराज यांचीही छायाचित्रे या संविधानाच्या प्रतीत आहेत. तसेच मुस्लिम राजांपैकी केवळ अकबराचे चित्र आहे. मात्र, अधिक काळ राज्य करणाऱ्या बाबरचे चित्र यात नसल्याचेही रविशंकर म्हणाले. त्याचबरोबर रविशंकर यांनी आपल्याकडे असलेल्या संविधानाच्या प्रतीच्या शेवटी संविधान निर्मात्यांची सही देखील असल्याचे सांगितले.           माझा पेपर                                                 

                                                                      

Find Out More:

Related Articles: