स्वातंत्र्यानंतर संस्थानं खालसा झाली ,आता कोणी राजे उरले नाहीत-अमोल कोल्हे

Thote Shubham

छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज उदयनराजे भोसले यांनी केलेल्या भाजप प्रवेशावर राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी जोरदार टीका केली आहे.जुलमी सत्तेच्या विरोधात केलं जातं ते बंड असतं, पण सत्तेच्या गोटात जाण्यासाठी होते ती फक्त फितुरी असते.स्वातंत्र्यानंतर सर्व संस्थानं खालसा झाली असून आता कोणीही राजे नाही, असं म्हणत कोल्हेंनी उदयनराजेंचा समाचार घेतला.

तसेच एकदा गणेशोत्सव संपला की विसर्जनानंतर त्यावर बोलायची गरज नाही, असं म्हणत अमोल कोल्हे यांनी भाजपच्या वाटेवर असलेले नवी मुंबईतील ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांनाही यावेळी टोला लगावला. नवी मुंबईत आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात खासदार डॉ. अमोल कोल्हे बोलत होते.

जनतेच्या विकासासाठी पक्षांतर करत आहे असे जेव्हा एखादा नेता म्हणतो, तेव्हा जनता स्वतःची कातडी बचावण्यासाठी असंच वाचते, कारण जनता आता दुधखुळी राहिलेली नाही. ज्या सरकारच्या पाच वर्षांच्या काळात १६ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, त्या सरकारमध्ये जाऊन कोणता विकास साधायचा आहे? असा घणाघात कोल्हेंनी पक्षांतर करणाऱ्या नेत्यांवर यावेळी केला.

तसेच, गड किल्ले विकायला काढण्याचा निर्णय घेतल्यावर पर्यटन मंत्र्यांनी मलाच तुम्हाला कोणाच्या लग्नाला जायचं आहे असा प्रश्न विचारल्याचं कोल्हेंनी सांगितलले . या सरकारने महाराष्ट्राचा स्वाभिमान विकायला काढण्याचं काम केल्याचा घणाघातही अमोल कोल्हे यांनी केला.                     

Find Out More:

Related Articles: