कलम 370 नंतर मोदी सरकार काश्मीर खोऱ्यातील 50 हजार मंदिरं खुली करणार - जी.किशन रेड्डी

frame कलम 370 नंतर मोदी सरकार काश्मीर खोऱ्यातील 50 हजार मंदिरं खुली करणार - जी.किशन रेड्डी

Thote Shubham
जम्मू काश्मीरचे कलम 370 हटवल्या नंतर मोदी सरकार काश्मीर मधील अनेक वर्षांपासून बंद असलेल्या 50 हजाराहून अधिक मंदिरं खुले करणार आहे. गृह राज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी याबाबतची माहिती दिली आहे. सध्या काश्मीर खोऱ्यातील बंद पडलेल्या मंदिरांचा सर्व्हे सुरु आहे. लवकरच खोऱ्यातील मंदिर खुली करण्यात येणार आहे.

याबाबत रेड्डी म्हणाले की, ‘आम्ही काश्मीर खोऱ्यात बंद पडलेल्या मंदिरांचा सर्व्हे करण्यासाठी एका समितीचं गठन करत आहे. मागील काही वर्षात जवळपास 50 हजार मंदिरं बंद झाली होती. त्यातील काही मंदिरं नष्टही झाली आणि मूर्ती फुटल्या गेल्या. आम्ही अशा मंदिरांच्या सर्व्हेचा आदेश दिला आहे.

दरम्यान जम्मू काश्मीरमध्ये 90 च्या दशकात दहशतवाद फोफावल्यानंतर काश्मिरी पंडितांना मोठ्या प्रमाणात अत्याचार झाला. त्यामुळे संबंधित काश्मिरी पंडितांना काश्मीरमधून पलायन करावं लागलं. दहशतवाद्यांनी खोऱ्यातील अनेक मंदिरांचंही नुकसान केलं. अनेक मंदिरं यामुळे बंद झाली. त्यामुळे आता या मंदिराच्या जीर्नोधारचा कार्यक्रम केंद्र सरकारने घेतले असल्याचं दिसत आहे.
                                                                                                                                    


Find Out More:

Related Articles:

Unable to Load More