
निष्क्रिय मंत्र्यांपेक्षा काम करणार्या माणसाला संधी द्या - धनंजय मुंडें
पाच वर्ष मंत्रीपद असूनही त्या माध्यमातून विकास करण्यात ज्या निष्क्रीय ठरल्या त्या विद्यमान मंत्र्यांऐवजी यावेळी विकास करणार्या माणसाला आशिर्वाद द्या, असे आवाहन विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केले.
विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी परळी विधानसभा मतदार संघातील गाव, वाडी, तांडा, वस्ती येथे संपर्क अभियान सुरू केले आहे. मतदार संघातल्या शेवटच्या माणसापर्यंत पोहचण्याचा ते प्रयत्न करीत आहेत.
आपली बाजू समजावून सांगताना विद्यमान मंत्र्यांवर ते निशाणा साधत आहेत. आज त्यांनी पोहनेर गणातील डिग्रस, पोहनेर, कासारवाडी, जळगव्हाण तांडा, रामनगर तांडा या 5 ठिकाणी मतदारांशी संवाद साधला.
पोहनेर दत्तक गावाचा तरी विकास झाला का ?भाताची परिक्षा शितावरून होत असते, मतदार संघाचा विकास जावु द्या, खासदारांनी दत्तक घेतलेल्या पोहनेर गावाचा तरी विकास झाला का ? असा प्रश्न त्यांना उपस्थित केला.