राज्य सहकारी बँकेच्या कर्जवाटप घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्यावर ईडीने गुन्हा दाखल केला आहे. याच पार्श्वभूमीवर शरद पवार आज दुपारी दोन वाजता बॅलार्ड पियर येथील सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) कार्यालयात स्वतःहून जाणार आहेत. त्यापूर्वी मुंबई पोलिसांनी कलम १४४ लागू करत मुंबईत जमावबंदी लावली आहे.
ईडी कार्यालयाच्या परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसेच तेथे शांतता राखली जाईल याची काळजी घ्यावी. त्याचप्रमाणे त्या परिसरातील वाहतुकीला व सर्वसामान्य नागरिकांना कोणत्याही प्रकारे त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी. पोलीस प्रशासन व इतर सर्व सरकारी यंत्रणांना आवश्यक ते सहकार्य करावे’ असं विधान केले आहे.
मात्र आता शरद पवार ईडीच्या कार्यालयात जाण्याआधीच ईडीने कठोर भूमिका घेतली आहे. शरद पवार आरोपी आहेत, ईडीमध्ये येण्याबाबत पवार ठरवू शकत नाहीत. चौकशीला बोलावल्यानंतरच पवारांना यावं लागेल, अशी माहिती ईडीच्या सूत्रांनी दिली आहे.
ईडी कार्यालयात जाण्याचा निर्धार शरद पवारांनी केला असला तरी त्यांना कार्यालयात प्रवेश मिळणार नसल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. शरद पवारांच्या ईडी ऑफिस भेटीच्या पार्श्वभूमीवर परिसरात जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. तसंच ईडी कार्यालयाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मुंबईतल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी व्हायला सुरुवात झाली आहे.
शरद पवार बाहेर पडले तर कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होईल, म्हणून त्यांनी घराबाहेर पडू नये, पोलीस विनंती करणार आहेत. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था Joint CP शरद पवार यांची भेट घेणार, त्यांच्या घरी येऊन भेट घेणार आहेत. तसेच पोलीस प्रशासनाने वेळीच खबरदारी घेत ईडी कार्यालयाबाहेर कलम 144 ( जमावबंदी ) लागू केले आहे.
तत्पूर्वी राष्ट्रवादीचे सगळे बडे नेते शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी जमा झाले आहेत. नवाब मलिक, अजित पवार, रोहित पवार, जितेंद्र आव्हाड, छगन भुजबळ हे नेते शरद पवारांसोबत असणार आहेत.