अजित पवारांचा राजीनामा म्हणजे एक्सपायरी संपलेली औषधी – सुधीर मुंनगंटीवार
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या आमदारकी पदाचा राजीनामा दिला आहे. अजित पवार यांनी अचानक तडकाफडकी राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चांना उधान आले आहे.
अजित पवार यांनी एका ओळीत राजीनामा दिला आहे. आपण आमदारकीचा राजीनामा देत आहोत, आणि त्याचा स्वीकार करावा, अशा एका ओळीत अजित पवारांनी हा राजीनामा दिली आहे. विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या कडे ई – मेल द्वारे अजित पवारांनी राजीनाम्याची प्रत पाठवली आहे. बागडे यांनी हा राजीनामा स्वीकारल्याचे सांगितले.
दरम्यान, आता अजित पवार यांच्या राजीनामा नाट्यावर भाजपनेते सुधीर मुंनगंटीवार यांनी निशाना साधला आहे. आचारसंहिता लागल्यानंतर आमदार असल कि काय नसल काय काय फरक पडतो ?, अजित पवारांचा राजीनामा म्हणजे एक्सपायरी संपलेली औषधी असा घणाघात सुधीर मुंनगंटीवार यांनी केला आहे.
अजित पवार यांच्या राजीनाम्याचा फॅक्स हा ५ वाजून ४० मिनिटांनी आला आहे. तसेच अजित पवार यांच्याशी आपले २ दिवसांपूर्वी फोनवर बोलणे झाले असल्याचंही हरिभाऊ बागडे यांनी म्हटलं आहे.