राजकारण नको रे बाबा आपली शेतीच करू, अजितदादांचा पार्थला सल्ला

frame राजकारण नको रे बाबा आपली शेतीच करू, अजितदादांचा पार्थला सल्ला

Thote Shubham

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या आमदारकी पदाचा राजीनामा दिला आहे. अजित पवार यांनी अचानक तडकाफडकी राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चांना उधान आले आहे.

यावर आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार यांनी आमदारकीचा राजीनामा दिला ही बातमी मला पुण्याला येताना समजली. मला यासंदर्भातली मला कोणताही कल्पना नव्हती. मी त्यांना, त्यांच्या कुटुंबीयांना संपर्क साधला. अजित पवार यांच्या मुलांशी चर्चा झाली.

त्यावेळी काकांवर गुन्हा दाखल झाल्याने मी अस्वस्थ आहे असं अजित पवार यांनी मुलांना सांगतिलं. त्याचमुळे त्यांनी राजीनामा दिला असावा असं मला वाटतं आहे असं  असं शरद पवार यांनी पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं आहे.

तर दुसरीकडे अजित पवार यांनी पार्थ पवार यांच्याशी चर्चा केली. राजकारणात इतक्या खालच्या पातळीचं राजकारण सुरु आहे असं म्हणत अजित पवार यांनी त्यांच्या मुलाशी चर्चा केली. आपण राजकारणात न राहिलेलं बरं असंही त्यांनी बोलून दाखवलं.

तर राजकारण करण्यापेक्षा शेती किंवा व्यवसाय करू असा सल्ला अजित पवार यांनी आपल्या मुलांना दिल्याचं देखील शरद पवार यांनी सांगितले आहे. माझ्याशी त्यांच्याशी काहीही चर्चा झालेली नाही. त्यांच्याशी चर्चा झाली की मी याबाबत बोलू शकेन असंही पवार यांनी स्पष्ट केलं.


Find Out More:

Related Articles:

Unable to Load More