यंदा बारामती जिंकून दाखवू, मुख्यमंत्र्यांकडून गोपीचंद पडळकरांना उमेदवारी जाहीर

Thote Shubham
वंचित बहुजन आघाडीचे नेते गोपीचंद पडळकर यांनी नुकतंच भाजपमध्ये घरवापसी केली आहे. त्यांनी घरवापसी केल्यानंतर लगेचच त्यांना बारामतीतून उमेदवारी जाहीर करण्यात आली.

येत्या विधानसभेत माजी उपमुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अजित पवार यांच्या विरुद्ध गोपीचंद पडळकर उतरणार असल्याची घोषणा खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. मुंबईत आयोजित केलेल्या मेगाभरतीच्या वेळी त्यांनी ही घोषणा केली.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोपीचंद पडळकर यांच्यासह काँग्रेस नेते काशीराम पावरा यांना भाजप प्रवेश घेतला. “मी भाजपमध्ये पहिल्यापासून कार्यकर्ता म्हणून काम केले आहे,  2014 पूर्वी राज्याला कोणी वाली राहतो की नाही अशी स्थिती उभी राहली होती. पण मुख्यमंत्र्यांच्या रुपात राज्याला गॉड गिफ्ट मिळालं आहे,” असे मत त्यांनी भाजप प्रवेशानंतर व्यक्त केले.

गोपीचंद पडळकर हा ढाण्यावाघ आहे. ढाण्या वाघाने जंगलाच्या वाघासारखं राहायचं असतं. माझी अशी इच्छा आहे की त्यांनी बारामतीतून उभे राहिले पाहिजे. जर तुमची सर्वांची अनुमती असेल तर मी पक्षाशी बोलतो आणि यावेळी बारामती आपण जिंकून दाखवू असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.                                                                                                                                       


Find Out More:

Related Articles: