नरेंद्र मोदींवर लेटर बॉम्ब टाकणाऱ्या 49 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Thote Shubham

मुजफ्फरपूरमध्ये मॉब लिंचिंगच्या वाढत्या घटनांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींना खुले पत्र लिहीणारे 49 लोकांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. रामचंद्र गुहा, मणिरत्नम, अनुराग कश्यप, श्याम बेनेगल आणि अपर्णा सेनसहित अनेकजणांचा यात समावेश आहे.

2 महीन्यांपूर्वी स्थानिक वकील सुधीर कुमार ओझा यांच्याकडून दाखल झालेल्या याचिकेवर मुख्य न्यायिक मेजिस्ट्रेट (सीजेएम) सूर्यकांत तिवारी यांच्या आदेशानंतर तक्रार दाखल करण्यात आली.ओ

झा म्हणाले की, 20 ऑगस्टला माझी याचिका सीजेएमने स्वीकार झाली. पोलिस स्टेशनमध्ये 3 ऑक्टोबरला तक्रार दाखल केली आहे. मोदींना लिहीलेल्या खुल्या पत्रात स्वाक्षरी करणाऱ्या 49 सेलिब्रेटींना याचिकेत आरोपी बनवले आहे. त्यांच्यावर देशाची छवी मलिन करणे आणि फुटिरतावादी प्रवृत्तीला चालना देण्याचा आरोप लावला आहे.

पोलिसांनी सांगितल्यानुसार, त्यांच्याविरोधात भारतीय दंड विधान(आयपीसी) च्या अनेक कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात धार्मिक भावनांना दुखवणे, राजद्रोह, शांती भंग करण, यांसारखे आरोप आहेत.

चित्रपट निर्माते मणिरत्नम, अनुराग कश्यपसहित 49 बड्या हस्ती कला, साहित्य आणि इतर क्षेत्रांशी निगडीत 49 लोकांनी 23 जुलैला मोदींच्या नावे खुले पत्र लिहीले होते. यात मुस्लिम, दलित आणि इतर समुदायांवर अनेक लोकांनी मारहाण (मॉब लिंचिंग) करण्यावर बंदी घालण्याची मागणी केली होती. या चिठ्ठीत अपर्णा सेन, कोंकणा सेन शर्मा, रामचंद्र गुहा, अनुराग कश्यप, शुभा मुद्गलसारख्या अनेक क्षेत्रातील दिग्गत हस्ती होते. दरम्यान, सरकारने पत्रामधील आरोपांचे खंडन केले होते.


Find Out More:

Related Articles: