मोदी आणि जिनपिंग यांच्या स्वागतासाठी फळ-भाज्यांची आरास

Thote Shubham

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्यामध्ये आज तामिळनाडूच्या महाबलीपूरम् येथे अनौपचारिक भेट होणार आहे. दोन्ही नेत्यांच्या स्वागतासाठी पंचरथ जवळ एक मोठे गेट सजवण्यात आले आहे. या गेटच्या सजावटीसाठी 18 प्रकारच्या फळ आणि भाज्यांचा वापर करण्यात आलेला आहे. या फळ आणि भाज्यांना तामिळनाडूच्या विविध भागातून मागण्यावत आले आहे.

डिपार्टमेंट ऑफ हॉल्टिकल्चरचे एडिशनल डायरेक्टर तमिलवेधन यांनी सांगितले की, यातील बहुतांश भाज्या या ऑर्गनिक आहेत व थेट शेतातून येथे आणण्यात आल्या आहेत.

शोर मंदिराजवळ बनवण्यात आलेल्या गेटवर पारंपारिक केळीची झाडे लावण्यात आली आहेत. पांढऱ्या आणि लाल गुलाबांचा देखील सजावटीसाठी उपयोग करण्यात आलेला आहे. 200 कर्मचाऱ्यांनी मिळून 10 तासात हे गेट सजवले आहे.

महाबलीपूरमचा 2000 वर्षांपासून आहेत चीनचे संबंध –

चेन्नईपासून 60 किमी अंतरावर महाबलीपूरम आहे. याची स्थापना धार्मिक उद्देषांद्वारे 7 व्या शतकात पल्लव वंशाचे राजा नरसिंह वर्मन यांनी केली होती. नरसिंह यांनी मामल्ल ही उपाधी धारण केली होती. त्यामुळे याला मामल्लपूरम म्हणून देखील ओळखले जाते. येथे शोधा दरम्यान चीन, रोमची प्राचीन नाणी सापडलेली आहेत. पल्लव शासनाच्या काळात चीनी प्रवाशी ह्येन सांग कांचीपूरम येथे आले होते. पल्लव शासनाने देखील चीनमध्ये आपले दूत पाठवले होते.                      


Find Out More:

Related Articles: