प्रकाश आंबेडकर यांची उद्या बारामतीत सभा

frame प्रकाश आंबेडकर यांची उद्या बारामतीत सभा

Thote Shubham

बारामती- वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर बुधवारी (दि. 16) बारामतीत सभा घेणार आहेत. वंचितचे बारामती विधानसभेचे उमेदवार अविनाश गोफणे यांच्या प्रचारार्थ ते तीन हत्ती चौकालगत नगर पालिकेसमोरील जागेत दुपारी तीन वाजता ते सभेला संबोधित करतील, अशी माहिती अविनाश गोफणे यांनी दिली.

तीन हत्ती चौकात सभा घेण्यास प्रशासनाने परवानगी नाकारल्यानंतर गोफणे यांनी थेट उपोषणाचाच इशारा दिला होता. मात्र, प्रशासनाने त्यांच्याशी चर्चा करुन नगर पालिकेसमोरील व तीन हत्ती चौकालगतची जागा देण्याचे कबूल केले.

गोफणे यांनीही सहकार्याची भूमिका घेत या सभेसाठी ही जागा स्वीकारली. त्यामुळे उपोषणाचा विषय त्यांनी सोडून देत सभेची तयारी सुरू केली आहे. प्रकाश आंबेडकर बारामतीत काय बोलणार याची आता सर्वांना उत्सुकता लागली आहे.                                                                                                                                                                   


Find Out More:

Related Articles:

Unable to Load More