दिल्लीसाठी क्रिकेट सामन्यापेक्षा प्रदूषण अधिक चिंतेचा विषय – गंभीर

Thote Shubham

माजी क्रिकेटपटू आणि भाजप खासदार गौतम गंभीरने दिल्लीतील वायू प्रदूषणाबद्दल चिंता व्यक्त केली आहे. क्रिकेट सामन्याच्या आयोजनापेक्षा दिल्लीतील प्रदूषणाची समस्या अधिक गंभीर असल्याचे गौतम गंभीर यांनी म्हटले आहे.

गौतम गंभीर म्हणाले की, क्रिकेट किंवा अन्य खेळांच्या सामन्यांपेक्षा दिल्लीतील प्रदूषण ही मोठी समस्या आहे. दिल्लीत राहणाऱ्यांसाठी क्रिकेट सामन्यापेक्षा प्रदूषण हा चिंतेचा विषय असायला हवा.

गंभीर पुढे म्हणाले की, हे केवळ खेळाडूंसाठीच नाही तर, सर्व दिल्लीकरांसाठी चिंतेचा विषय आहे. कोणतेही सामने या गोष्टीसमोर नगण्य आहेत.

दिल्लीतील प्रदूषणाचा स्तर नेहमीप्रमाणेच वाढला आहे. 3 नोव्हेंबर रोजी दिल्लीतील अरूण जेटली स्टेडियममध्ये बांगलादेश आणि भारताच्या संघामध्ये पहिला टी20 सामना खेळला जाणार आहे.

लहान मुलांपासून ते वृध्दांपर्यंत सर्वांना याचा सामना करावा लागत आहे. आधीच्या तुलनेत प्रदूषण कमी आहे. याचे श्रेय दिल्लीकरांनाच जाते. मात्र आपल्याला आणखी मेहनत घ्यायची गरज असल्याचे देखील, गौतम गंभीर म्हणाले.

दिल्लीतील नागरिकांना या समस्येचा सामना करावा लागत असून, कोणत्याही सामन्यापेक्षा ही अधिक चिंतेची बाब असल्याचे, गंभीर म्हणाले.                                                                                                                                 


Find Out More:

Related Articles: