राज्यात भाजपचं नव्हे तर शिवसेनेचंच सरकार येणार - जयंत पाटिल

frame राज्यात भाजपचं नव्हे तर शिवसेनेचंच सरकार येणार - जयंत पाटिल

Thote Shubham

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी शिवसेनेला पाठींबा देण्याबाबत सूचक विधान केले आहे. जयंत पाटलांच्या या विधानामुळे राज्यात शिवसेनेला काँग्रेस-राष्ट्रवादीचा पाठिंबा मिळणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

एका पत्रकार परिषदेत बोलताना जयंत पाटील यांनी भाजपला इशारा देत शिवसेनेला पाठींबा देण्याचे विधान केले आहे. राज्यात भाजपचं नव्हे तर शिवसेनेचंच सरकार येणार आहे. जर भाजपने शिवसेनेचे आमदार फोडल्यास पोटनिवडणुकीत आम्ही शिवसेनेला पाठिंबा देऊन त्यांचे उमेदवार पुन्हा निवडून आणू, असे सूचक विधान पाटील यांनी केले आहे.

राज्यात भाजप – शिवसेनेमध्ये सत्तेच्या समान वाटपावरून मतभेद झाल्याने राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. तर शिवसेनेने कॉंग्रेस – राष्ट्रवादी कॉंग्रेसला बरोबर घेऊन सत्ता स्थापनेची अप्रत्यक्षरित्या तयारी दाखवली आहे. त्या दृष्टीने कॉंग्रेस आघाडीतही शिवसेनेला पाठींबा देण्याबाबत खलबत सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यात जयंत पाटील यांनी केलेल्या सूचक विधानानंतर भाजपच्या अडचणीत वाढ झाल्याचं दिसत आहे.                                                                                                                                

Find Out More:

Related Articles:

Unable to Load More