ज्याचे जास्त आमदार त्याच पक्षाचा मुख्यमंत्री – नितीन गडकरी

Thote Shubham

ज्या पक्षाच्या जास्त आमदार असतात, मुख्यमंत्री त्याच पक्षाचा होतो. भाजपचे सर्वाधिक १०५ उमेदवार विधानसभा निवडणुकीत निवडून आले असल्यामुळे भाजपचाच मुख्यमंत्री होणार, असे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी स्पष्ट केले. विमानतळाबाहेर ते पत्रकारांशी बोलत होते. त्यांनी यावेळी देवेंद्र फडणवीस हे आमचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असल्याचे सुद्धा स्पष्ट केले.

नितीन गडकरी म्हणाले, आमची शिवसेनेशी बोलणी सुरू असून महाराष्ट्राच्या हिताचा लवकरच निर्णय होईल, याचा मला विश्वास आहे. ज्यांच्या जास्त जागा त्यांच्याच मुख्यमंत्री होतो. भाजपचे सर्वाधिक १०५ उमेदवार विधानसभा निवडणुकीत निवडून आल्यामुळे मुख्यमंत्री भाजपचाच होणार हे स्पष्ट आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि शिवसेनेतील सत्ता वाटपाचा तिढा सोडविण्यासाठी प्रयत्न करीत असल्याच्या बातम्या येत होत्या. नितीन गडकरी त्या पार्श्वभूमीवर म्हणाले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ किंवा सरसंघचालक मोहन भागवत यांचा तिढा सोडविण्याशी काहीही संबंध नाही.

आमचे निर्णय सर्वस्वी भाजप करीत असतो. भाजपने आपला निर्णय केला आहे. देवेंद्र फडणवीस यांना विधीमंडळ पक्षाचा नेता म्हणून निवडण्यात आले आहे. त्यामुळे तेच मुख्यमंत्री होणार. मी आता दिल्लीत केंद्रीय सरकारमध्ये कार्यरत असल्यामुळे परत महाराष्ट्रात मुख्यमंत्री म्हणून येण्याचा प्रश्नच येत नसल्याचेही त्यांनी सांगितले.                                                              


Find Out More:

Related Articles: