शपथविधीबाबत राजभवनात चौकशी करा : शरद पवार

Thote Shubham

मुंबई : राज्यातील शपथविधीबाबत बोलताना याबाबत राजभवनातच चौकशी करा, अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर सुरू झालेल्या सत्तास्थापनेच्या राजकीय रणधुमाळीत सुरुवातीपासूनच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार केंद्रस्थानी आहेत.

शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी एकत्र येत असल्याने राज्यातील सत्ताकोंडी फुटण्याची दाट शक्यता आहे.राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून तीन आठवड्यांचा कालावधी उलटला आहे. तरी सत्तास्थापनेचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. सर्वच प्रमुख पक्षांना सत्तास्थापनेत अपयश आल्यानं अखेर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली.

भाजपाचे आमदार जयकुमार गोरे हे आज राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या भेटीला गेल्या असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. परंतु त्यानंतर शरद पवारांना याबाबत विचारलं असता आपल्याला याबाबत काहीही माहित नसल्याचं सांगितलं.

या सर्व घडामोडी घडत असताना, या शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीत महत्त्वाची भूमिका बजावणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार हे आज पुण्यातील निवासस्थानावरून एका कार्यक्रमासाठी जात होते. त्यावेळी राज्यात केव्हापर्यंत सत्ता स्थापन होणार आणि शपथविधी होणार याबाबत विचारण्यात आला. यावर उत्तर देताना मी दिल्लीला जात असून तुम्ही राजभवनला चौकशी करा, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.                                                

Find Out More:

Related Articles: