
निकालातील नंबर गेममुळे शिवसेनेची बार्गीनींग पॉवर वाढली – देवेंद्र फडणवीस
विधानसभा निकालातील नंबर गेममुळे शिवसेनेची पॉवर वाढली. त्यानंतर त्यांनी अडीच वर्ष मुख्यमंत्री पदासाठी भाजपला धमकावण्याचा प्रयत्न केला. असी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली. अजित पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर ते पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले, ” विधानसभेच्या निवडणुकीत जनतेने महायुतीला संपूर्ण बहुमत दिलं तर भाजपने १०५ जागी विजय मिळाला. मात्र सरकार स्थापन करता आलं नाही. शिवसेनेने पहिल्या दिवसापासून बार्गेनिंगला सुरवात केली. मात्र शिवसेना चर्चेला आली नाही. शिवसेनेने मुख्यमंत्री पदासाठी हट्ट धरला. युतीत असताना आमच जे ठरलं होत ते आम्ही त्यांना द्यायला तयार होतो,. मात्र अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदासाठी आमच काही ठरलं नव्हत.”