उपमुख्यमंत्री कोण, हे २२ डिसेंबरनंतर ठरेल - प्रफुल्ल पटेल

Thote Shubham

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारने आज विधानसभेत बहुमताची अग्निपरीक्षा १६९ विरुद्ध ० अशी सहजपणे पार केल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोणाच्या गळ्यात उपमुख्यमंत्रिपदाची माळ पडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले असून त्यासाठी येत्या २२ डिसेंबरपर्यंत वाट पाहावी लागणार, हे स्पष्ट झाले आहे.


 
महाविकास आघाडीचं सत्तावाटप निश्चित झालं आहे. त्यानुसार मुख्यमंत्रिपद शिवसेनेकडे, विधानसभेचं अध्यक्षपद काँग्रेसकडे तर विधानसभेचं उपाध्यक्षपद व उपमुख्यमंत्रिपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे असणार आहे. यानुसार उद्धव ठाकरे सरकार बहुमताची अग्निपरीक्षा पास झाल्यानंतर उद्या रविवारी विधानसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक होत आहे.
 
काँग्रेसकडून या पदासाठी नाना पटोले यांनी आपला अर्ज दाखल केला आहे तर त्यांच्याविरुद्ध भाजपने किसन कथोरे यांना उमेदवारी दिली आहे. या अनुशंगाने राष्ट्रवादी काँग्रेसकडून उपमुख्यमंत्रिपदाची माळ कोणत्या नेत्याच्या गळ्यात पडणार, असा प्रश्न राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांना विचारण्यात आला असता त्यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली.
 
उपमुख्यमंत्रिपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे असणार आहे व नागपूर येथे होणारं हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर म्हणजेच २२ डिसेंबरनंतर या पदाबाबद पक्ष निर्णय घेणार आहे, असे प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.

Find Out More:

Related Articles: