राज्याच्या आर्थिक स्थितीची श्वेतपत्रिका काढणार - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Thote Shubham

मुंबई : राज्याच्या आर्थिक परिस्थितीबाबत लवकरच श्वेतपत्रिका काढण्यात येणार आहे. या माध्यमातून जनतेसमोर वास्तव मांडणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी स्पष्ट केले. सध्या राज्यातील प्रकल्प प्रगतीपथावर आहे. त्यासाठी लागणारा खर्च व निधीची उपलब्धता याचा विचार करून कामांचा प्राधान्यक्रम निश्चित करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

 

विधिमंडळाचे दोन दिवसांचे अधिवेशन संपले. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. संपूर्ण राज्यामध्ये कोणती विकास कामे सुरू आहेत. ही कामे कुठे सुरू आहेत. या कामांवर किती खर्च केला जात आहे, यामधील किती कामे पूर्णत्वाला आली आहेत. कोणती कामे रखडलेली आहेत. रखडली असतील तर त्यामागील कारणे कोणती.

 

या सर्वांचा तपशिल आर्थिक श्वेतपत्रिकेच्या माध्यमातून जनतेसमोर मांडण्यात येणार आहे. अशी माहिती उद्धव ठाकरेंनी दिली. पुढे ठाकरे म्हणाले की, निधीच्या उपलब्धतेनुसार कामांचा प्राधान्यक्रमाचा निर्णय घेण्यात येईल. सरकार संपूर्ण प्रकल्पांचा आढावा घेणार आहे. आधी आढावा घेऊन त्यानंतरच निर्णय घेतले जातील. असेही उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केले आहे.                                                                                                                                      

Find Out More:

Related Articles: