...तर सर्व पुरावे जगासमोर मांडेन; एकनाथ खडसे चा गिरीश महाजनांवर पलटवार

Thote Shubham

विधानसभा निवडणुकीत रोहिणी खडसे यांना भाजपमधीलच लोकांनी पाडल्याचे पुरावे खडसेंनी सादर करावेत, असे आव्हान देणाऱ्या गिरीश महाजन यांच्यावर शनिवारी नाथाभाऊंनी पलटवार केला. गिरीश महाजन म्हणतात त्याप्रमाणे मी पत्रकारपरिषद घेऊन पुरावे जाहीरपणे मांडायला तयार आहे. प्रत्येकाच्या नावानिशी माझ्याकडे पुरावे आहेत. मात्र, पक्षाच्या अध्यक्षांनी मला तशी परवानगी दिली पाहिजे. त्यांनी परवानगी दिली तर मी तात्काळ पत्रकारपरिषद घेऊन हे पुरावे सर्वांसमोर मांडेन असे खडसे यांनी सांगितले. 

 

जळगावमध्ये आज भाजपकडून उत्तर महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांतील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली जात आहे. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ नेते उपस्थित आहेत. यावेळी एकनाथ खडसे यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न होतील, अशी चर्चाही आहे. मात्र, काल उत्तर महाराष्ट्राच्या राजकारणातील खडसेंचे प्रतिस्पर्धी गिरीश महाजन यांनी त्यांना आव्हान दिले होते. कुणीही कुणाला पाडत नसते.

 

मुक्ताईनगर मतदारसंघातून खडसे यापूर्वी अवघ्या १२०० आणि ८५०० हजार मतांच्या फरकाने निवडून आले होते. मात्र, यावेळी त्यांना तिकीट न मिळाल्यामुळे फरक पडला. त्यामुळे रोहिणी खडसे यांना मुद्दामून पाडल्याचे पुरावे असतील तर एकनाथ खडसे यांनी ते गुप्त न ठेवता जाहीर करावेत, असे आव्हान गिरीश महाजन यांनी दिले होते. दरम्यान, आजच्या बैठकीतून खडसे बाहेर पडल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर प्रचंड नाराजी होती. या बैठकीला खासदार रक्षा खडसे आणि रोहिणी खडसे यादेखील उपस्थित होत्या.                     

Find Out More:

Related Articles: