संविधानाची चौकट ओलांडल्यास बाहेर पडू - अशोक चव्हाण

Thote Shubham

‘संविधानाच्या मूल्यावर आधारीत कॉमन मिनिमम प्रोग्राम अर्थात एकसूत्री कार्यक्रमाची चौकट मोडली तर निर्णय घेण्यासाठी आम्ही मोकळे आहोत असे अशोक चव्हाण म्हणाले. ते एका वृत्तवाहिनी मुलाखत देताना बोलत होते. यावेळी बोलताना खातेवाटपाविषयी ते म्हणाले की, ‘खातेवाटपाविषयी कोणताच वादाचा विषय नाही.

 

तिन्ही पक्षांना काम करण्याची संधी हवी. तिन्ही पक्षांची हीच इच्छा आहे. जनतेसाठी जास्तीत जास्त काम करता यावं, असे खाते आपल्याला मिळावं अशी प्रत्येक पक्षाची इच्छा आहे, असे ते म्हणाले.

तसेच ‘काही महत्त्वाच्या खात्यावर चर्चा सुरू आहे. चर्चा सुरू असताना कोणतेही काम थांबलेल नाही. कॅबीनेटच्या बैठका सुरू आहेत. पाच वर्षे सरकार टिकवण्यासाठी एकवाक्यता येण गरजेचे आहे, असे म्हणत लवकरच खातेवाटप होईल असे संकेत चव्हाण यांनी यावेळी बोलताना दिले.

 

दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी-कॉंग्रेस मधून पक्षांतर झाले होते. तसेच अनेक नेते महाविकास आघाडीच्या संपर्कात आहेत असे दावे जेष्ठ नेते करत आहेत. याबबत चव्हाण म्हणाले,’पक्षांतर केलेल्या नेत्यांना पुन्हा पक्षात यायच असेल तर त्यांच्याविषयी पक्षाला विचार करावा लागेल. त्यांच्याविषयीचा पूर्ण निर्णय पक्षश्रेष्ठींचा आहे, असे ते म्हणाले.                                                                             

Find Out More:

Related Articles: