औरंगाबादेतील वृक्षतोडीवरून प्रियंका चतुर्वेदी आणि अमृता फडणवीस यांच्यात ट्विटरवॉर

frame औरंगाबादेतील वृक्षतोडीवरून प्रियंका चतुर्वेदी आणि अमृता फडणवीस यांच्यात ट्विटरवॉर

Thote Shubham

मुंबई : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांनी रविवारी ट्विटरच्या माध्यमातून मुंबईतील आरे भागातील वृक्षतोड थांबवण्यासाठी मेट्रो कारशेडला स्थगिती देणारी शिवसेना औरंगाबादेत एक हजार वृक्षतोडीस कशी तयार होते? असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उद्देशून केला. कमिशनखोर शिवसेना पार्टी असल्याचा आरोपही त्यांनी केला.

 

शिवसेनेच्या उपनेत्या प्रियंका चतुर्वेदी यांनीही त्यावर ट्विटरद्वारे चोख प्रत्युत्तर देत कदाचित भाजपचे झाडे तोडण्यासाठी कमिशन घेणे हे नवे धोरण असावे, असा टोला लगावला. तुमच्या सोयीनुसार वृक्षतोड ही केली जाते. कमिशन तुम्हाला मिळाले की तुम्ही वृक्षतोडीस राजी होता. हे अक्षम्य पाप आहे. ढोंगीपणा हा रोग आहे. गेट वेल सून शिवसेना…’ असा टोला अमृता यांनी ट्विटरद्वारे लगावला होता. त्यानंतर या शब्दांत प्रियंका यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

 

शिवसेनेच्या उपनेत्या प्रियंका चतुर्वेदी यांनी अमृता फडणवीस यांना प्रत्युत्तर देताना एक ट्विट केले. त्या म्हणतात, ‘मॅम, सॉरी, तुम्हाला निराश करत आहे. कारण यापूर्वीच औरंगाबादच्या महापौरांनी हे स्पष्ट केले आहे की, ठाकरेंच्या स्मारकासाठी एकही झाड तोडले जाणार नाही. बळजबरीने खोटे पण रेटून बोलणे हा सगळ्यात मोठा रोग आहे.                                                                       

 

View image on Twitter

Find Out More:

Related Articles:

Unable to Load More