जिल्हा परिषदेत सुद्धा महाविकास आघाडी, बाळासाहेब थोरात यांनी दिले संकेत

Thote Shubham

मुंबई – काँग्रेस राज्यातील पाच जिल्हा परिषदच्या निवडणुकांसाठी तयारीला लागली असून पहिल्यापासूनच काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी आहे. दरम्यान काँग्रेस-राष्ट्रवादीला सत्तेसाठी तयार झालेली महाराष्ट्र विकास आघाडीमुळे शिवसेनेच्या रुपात नवा सोबती मिळाला आहे. दरम्यान, शिवसेनेबरोबर जिल्हा परिषद निवडणुकीसाठी युती करण्याचा निर्णय घेण्याचा अधिकार पक्षाच्या स्थानिक युनिटला देण्यात आला आहे.

 

नागपूर, अकोला, वाशिम, धुळे आणि नंदुरबारमध्ये महाराष्ट्र विकास आघाडीच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच जिल्हा परिषदेच्या निवडणुका होत आहेत. यासाठी 7 जानेवारी 2020 रोजी मतदान होणार आहे. दरम्यान जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्रित लढणार की नाही हे अद्याप पूर्णपणे स्पष्ट झाले नाही.
 
 
या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेबत थोरात यांनी शुक्रवारी पक्षाच्या नेत्यांसोबत बैठक घेतली. ज्या ठिकाणी आम्ही कमकुवत आहोत त्या ठिकाणी शिवसेनेसोबत जाण्याचा विचार केला जाऊ शकतो असे पक्षाच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले. विशेषतः अकोल्यात वंचित बहुजन विकास आघाडीविरुद्ध लढण्यासाठी काँग्रेसला इतर मित्रपक्षांची गरज भासणार आहे.                                                      

Find Out More:

Related Articles: