मुख्यमंत्री हे खुर्ची टिकवण्यासाठी कवायत करत आहेत, फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना टोला

Thote Shubham

मुंबई हिवाळी अधिवेशनाचा आज चौथा दिवस आहे. दरम्यान विधिमंडळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यात चांगलीच खडाजंगी पाहायला मिळाली. बुधवारी देवेंद्र फडणवीसांना अनेक मुद्द्यावरुन महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारवर टीकास्त्र साधले होते. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठाकरे शैलीमध्ये त्यांना उत्तर दिले आहे. यानंतर फडणवीसांना उद्धव ठाकरेंना सवाल केले यानंतर त्यांनी सभात्याग केला आहे.

 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे खुर्ची वाचवण्यासाठी कवायत करत असल्याचे म्हणत देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्यावर केली आहे. राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभेत उत्तर दिले. यानंतर घोषणाबाजी करत विरोधकांनी सभात्याग केल्यानंतर फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना उद्धव ठाकरेंवीर टीकास्त्र सोडले आहे.

 

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, उद्धव ठाकरे यांचं सरकार शेतकरी विरोधी आहे. दोन्ही सहकारी पक्षांना खूश ठेवण्याच्या प्रयत्नात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर दुर्लक्ष होत असल्याची टीकाही उद्धव ठाकरेंनी केली आहे. यासोबतच मुख्यमंत्री केवळ खुर्ची वाचवण्यासाठी कवायत करत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला आहे.

 

सत्तेत येऊनही शेतकऱ्यांसाठी सरकारकडून कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. हेक्टरी 25 हजारांच्या मदतीचं काय झालं? असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला आहे. तसेच मुख्यमंत्र्यांचं भाषण हे काळ्या दिवसासारखं असल्याचंही विधान फडणवीस म्हणाले.                                                        

Find Out More:

Related Articles: