योग्य वेळी लोक भाजपाला धडा शिकवतील, देशातही झारखंडची पुनरावृत्ती होणार - शरद पवार

Thote Shubham

मुंबई : देशातील अनेक शहरात अस्वस्थता, लोक योग्य वेळी योग्य निर्णय घेतील व देशातून भाजपाला हद्दपार करेल असं वक्तव्य राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. देशातील 5 व्या राज्यातून भाजपा हद्दपार झाली आहे. सत्तेचा दूरूपयोग करून सत्ता मिळवण्याचा प्रयत्नदेखील झारखंडमध्ये झाला.

 

देशची अर्थव्यस्था बिघडलेली. मुळ समस्येपासून दूर जाण्यासाठीच एनआरसी कॅबचा घाट घालण्यात आला असून यामुळे देशाच्या एकतेला यापासून धोका आहे. यामुळेच लोक रस्त्यांवर उतरले आहेत. रस्त्यांवर उतरलेल्या लोकांनी लोकशाही मार्गाने विरोध करावा हिंसक निदर्शने करू नका, असं आवाहनही शऱद पवार यांनी केले.

 

NRC आणि CAA या दोन विधेयकावरून देशभर हिसंक निदर्शने होत आहेत. देशातील जनतेला केंद्र सरकाने घेतलेला हा निर्णय रूचलेला नाही. त्यामुळेच बहुतांश लोक रस्त्यांवर उतरून आपला विरोध व्यक्त करत आहेत. या आंदोलकांना पवार यांनी शांततेत आंदोलन करण्याचा सल्ला दिला. देशातील प्रत्येक नागरिकाला आपला विरोध व्यक्त करण्याचा अधिकार आहे. मात्र हा विरोध व्यक्त करताना सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होणार नाही याची काळजी जनतेने घेण्याची गरज असल्याचे पवार म्हणाले.                                                                             

 

 

Find Out More:

Related Articles: