वाईट नेता मिळणे ही महाराष्ट्राची चूक नाही पण अशा नेत्यासोबत राहणे ही चूक आहे - अमृता फडणवीस
महाराष्ट्राच्या राजकारणात एकाएकी भूकंप झाला आणि शिवसेना – भाजपची युती तुटली. त्यानंतर मुख्यमंत्री पदावर विराजमान झालेल्या उद्धव ठाकरेंवर भाजपची आगपाखड सुरु झाली. विरोधी पक्षनेते पदी विराजमान झालेले देवेंद्र फडणवीस यांच्यासह त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करायला सुरुवात केली.
याच पार्श्वभूमीवर शनिवारी रात्री अमृता फडणवीस यांनी पुन्हा एकदा ट्विट करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निशाना साधला आहे. या ट्विटमध्ये अमृता फडणवीस म्हणतात की, ‘वाईट नेता मिळणे ही महाराष्ट्राची चूक नाही, पण अशा नेत्यासोबत राहणे ही चूक आहे, असे म्हणत ‘जागो महाराष्ट्र’ अशी टिप्पणी केली आहे.
तसेच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कन्या दिविजा फडणवीस राहत असलेल्या खोलीच्या भिंतीवर Who is UT? UT Is mean? Shut Up अशी वाक्य लिहिण्यात आली आहे. Who is UT? युटी कोण आहेत, UT Is mean? युटी वाईट आहेत असे वर्षा बंगल्याच्या भितींवर लिहिलं आहे. BJP is rock, Bjp and shivsena were friend, Fadnavis rock असेही या भितींवर लिहिलं आहे.
याच प्रमाणे वर्षा बंगल्याच्या आतील भिंतींवर भाजप रॉक्स, देवेंद्र फडणवीस रॉक्स असे शब्द लिहिलेले दिसत आहेत. भिंतींवरील काही वाक्यांमध्ये यूटी वाईट आहेत (UT is mean), असा उल्लेख करण्यात आला आहे. यूटी म्हणजे नेमकं काय अशा चर्चांना त्यामुळे सुरुवात झाली आहे. ‘वर्षा’ बंगल्यातील भिंतीवर लिहिलेल्या वाक्यांवरुन आता राजकारणाला सुरुवात झाली आहे. या भिंतींवर लिहिलेल्या मजकुराचा व्हिडीओही समोर आला आहे.