105 जागांवर भाजप निवडून आली तरी विरोधी पक्षात बसली, हा नियतीचा खेळ - धनंजय मुंडे
सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये आता आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरु झाले आहे. महाविकास आघाडी सरकार हे पाच वर्षे काय काही महिने देखील टिकणार नाही असा विश्वास विरोधक व्यक्त करत आहे. मात्र हे सरकार पूर्ण वेग चालणार, असा दावा सत्ताधारी पक्षातले नेते करत आहेत.
तसेच जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांची नाशिक येथे प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती. या प्रचारसभेत त्यांनी भाजपवर सडकून टीका केली. ते म्हणाले, ‘विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक अशा 105 जागांवर भाजप निवडून आली तरी विरोधी पक्षात बसली. हा नियतीचा खेळ आहे”, असे धनंजय मुंडे म्हणाले.