आमदारांचे हात-पाय गळू नये म्हणून विरोधक अश्या गोष्टी पसरवत असावेत – अजित पवार
पाच वर्ष आपल्याला विरोधी पक्षात बसायचं आहे आणि त्यानंतर आपण जनतेसमोर जाऊ असे आपल्या आमदारांना सांगू शकत नसल्याने विरोधक हे सरकार लवकर पडेल असा अपप्रचार करीत असावे असे राज्याचे उप मुख्यमंत्री अजित पवार म्हणाले .
राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची शरद पवारांसोबत झालेल्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते . पाच वर्ष विरोधात राहायच आहे असा आमदारांना सांगितला तर ते हात-पाय गळून बसतील म्हणून भाजप हे सरकार लवकरच पडेल अस त्यांना विश्वास देण्यासाठी सांगत असेल असे अजित पवार पत्रकारांनी प्रश्न विचारले असता म्हणाले .
शरद पवारांनी सर्व मंत्र्यांना राज्याच्या विकासासाठी काम करण्यासाठी मार्गदर्शन केले तसेच ज्या मंत्र्यांना काही प्रश्न आणि अडचणी होत्या त्यानाही शरद पवारांनी उत्तर दिली अशी माहिती उप मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली . तसेच शिवेसना कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीची समन्वय समिती बाबतही चर्चा झाल्याची माहिती त्यांनी या वेळी पत्रकारांना दिली. महाविकास आघाडी आता कामाला लागेल असेही त्यांनी नमूद केले .