‘गोपीनाथ मुंडेंच्या विचारांचा वारसा घेऊन मी राजकीय जीवनात वाटचाल करत आहे’ - धनंजय मुंडे
गोपीनाथ मुंडे यांच्या विचारांचा वारसा घेऊन मी राजकीय जीवनात वाटचाल करत आहे, असे राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तसेच बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे म्हणाले. ते परळी येथे कार्यकर्त्यांशी बोलत होते.
यावेळी बोलताना मुंडे म्हणाले, परळीच्या जनतेने मला अभूतपूर्व प्रेम दिलं आहे. त्या प्रेमाच्या ऋणातून मी कधीच उतराई होऊ शकत नाही. त्यामुळेच कदाचित विधात्याने मला बोलण्याची संधी दिली नसावी. मी परळीकर जनतेचे उपकार कधीच विसरु शकत नाही,’ असे भावना त्यांनी व्यक्त केली.
राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तसेच बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे शुक्रवारी परळीत दाखल झाले. संध्याकाळी सुरु झालेल्या ही मिरवणूक जवळपास चार तासांपेक्षा अधिक वेळ सुरु होती. या मिरवणुकीनंतर रात्री 11च्या सुमारास मुंडे यांनी परळीकरांचे आभार मानले. यावेळी ते बोलत होते .
दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यासह बीड जिल्ह्याचा तसेच परळी मतदारसंघाचा विकास करण्यासाठी माझ्यावर जबाबदारी दिली आहे. ती मी पूर्णपणे पार पाडेन, असा शब्द मुंडे यांनी कार्यकर्त्यांना दिला.