सीएए, एनआरसी विरोधात ‘वंचित’चा एल्गार, आज महाराष्ट्र ‘बंद’चे आवाहन

Thote Shubham

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने केंद्र सरकारच्या नागरिकत्व सुधारित कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणीच्या विरोधात आज, महाराष्ट्र ‘बंद’चे आवाहन केले आहे. बंदला मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळत असल्याचा दावा आघाडीचे अध्यक्ष अड. प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

 

या बंदमध्ये सुमारे २५ ते ३० संघटना सहभागी होतील असा दावा वंचित बहुजन आघाडीकडून करण्यात आला आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आजचा महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला आहे. तसेच नोटबंदी, जीएसटी या निर्णयांमुळे केंद्र सरकाविरोधात निषेधाचं वातावरण तयार झालं. त्यामुळे केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी आम्ही बंदचं आवाहन केलं आहे. आमच्या बंदमध्ये २५ ते ३० संघटना सहभागी होतील याचा आम्हाला विश्वास आहे असे प्रतिपादन प्रकाश आंबेडकर यांनी केले.

 

तसेच ‘जातीनिहाय जनगणनेची मागणीही त्यांनी या वेळी केली आहे. केंद्र सरकारच्या नागरिकत्व कायद्याला विरोध करीत आंबेडकर यांनी ढासळत्या अर्थव्यवस्थेला मोदी सरकार जबाबदार असल्याची टीका केली. लोकांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न होत आहे. नागरिकत्व कायद्याला विरोध होत असताना, हा कायदा लागू करणारच, अशी भूमिका शहा मांडत आहेत, हे दुर्दैव आहे,’ असे आंबेडकर म्हणाले.

 

दरम्यान, ‘महाराष्ट्र बंद करुन झोपलेल्या सरकारला जागे करु, हा बंद शांततेने करणार आहोत, असं प्रकाश आंबेडकर यांनी गेल्या आठवड्यात पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं होते. तसेच वंचित बहुजन आघाडी ही भाजपच्या चुकीच्या धोरणांना सातत्याने विरोध करत आहे. आतादेखील आम्ही भूमिका घेतली आहे. आमच्यानंतर इतर लोक भूमिका घेतील, असे प्रकाश म्हणाले होते.

 
 

Find Out More:

Related Articles: