शरद पवार सुरक्षा काढून घेतली ही अफवा,यामध्ये काही तथ्य नाही - अमृता फडणवीस
शरद पवार सुरक्षा काढून घेतल्याबाबत अफवा पसरवली जात असेल,यामध्ये काही तथ्यही नसेल असं वाटत आहे,असं म्हटले आहे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी असे म्हटले आहे.
नाईट लाईफविषयी अजून काही विचार केलेला नाही, यात सुरक्षा कशी घेतली जाईल,पण नाईट लाईफ महिलांसाठी मुबंई ही सुरक्षित आहे, आज महिला दिवस रात्र इथे काम करतात, इतर शहरामध्ये देखील महिलांनी असं करायला हवं.असेही त्यांनी पुढे म्हटले आहे तर राज ठाकरे नवीन दिशा पाहिली त्याचं मला खूप कौतुक वाटले ते , खूप चांगलं काम करतील अशी आशा आहे.असंही त्यांनी म्हटले आहे.
तर माझ्या सारख्या शिवसैनिकाला खरा नेता पाहण्याची गरज असते.त्यांना फॉलो करण्याची गरज असते, त्यामुळे आता आपल्याला खऱ्या नेत्याची खूप गरज आहे.असा टोला त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.
तर फोन टॅप प्रकरणावर म्हणाल्या की या तिघा पक्षांना भाजप नकोय, त्यामुळे ते भाजपवर खोटे आरोप करतायत. आणि आधीच्या सरकारमध्ये शिवसेना देखील होती त्यामुळे याची चौकशी झाली तरी चालेल.एकंदरीत सगळ्याच विषयावर अमृता यांनी बेधडक उत्तरे दिली आहेत.