महाविकास आघाडी ‘ मल्टीस्टारर ‘ सिनेमा नसून ‘ हॉरर ‘ सिनेमा - देवेंद्र फडणवीस
महाविकास आघाडी हा मल्टीस्टारर सिनेमा नसून, हा तर हॉरर सिनेमा आहे. अशा आशयाच ट्वीट केलं आहे ते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी.लोकसभा हरल्यामुळे आता अशोकराव खुश असतील. किमान त्यांना मंत्री होता आले. तो आनंद सुद्धा किती काळ टिकेल, हे आज सांगता येत नाही.
केवळ सत्तेसाठी एकत्र आले तर ते सरकार फार काळ टिकत नाही. एकत्र येण्यासाठी समाजकारण करावे लागते.असही त्यांनी पुढे म्हटले आहे. नांदेड येथे प्रजासत्ताक दिनानिमित्ताने आयोजित एका कार्यक्रमात अशोक चव्हाण म्हणाले होते. की, ‘ आम्ही तीन पक्ष एकत्र येऊ असं वाटत नव्हतं. पण आम्ही एकत्र आलो, हल्ली मल्टिस्टारचा जमाना आहे, तीन हिरो पाहिजे. त्यामुळे आमचं सरकार आलं असे विधान त्यांनी यावेळी बोलताना केले होत.
पुढे बोलताना ते म्हणाले, तीन पक्षांचं सरकार म्हणजे तीन विचारांचं सरकार, हे सरकार चालणार कसं? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. दिल्लीमध्ये आमच्या ज्येष्ठ नेत्यांना भेटलो. त्यांनी परवानगी देण्यास नकार दिला. मात्र चिंता करु नका. मी स्वत: मुख्यमंत्री म्हणून दोन पक्षांचं सरकार चालवलं आहे. त्यात अजून एका पक्षाची भर होईल. त्यात चिंता करायचं कारण नाही’, अशी माहिती चव्हाण यावेळी यावेळी दिली होती. याच मुद्यावर देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे.