महाराष्ट्राची निराशा करणारा अर्थसंकल्प - छगन भुजबळ
‘अर्थसंकल्प महाराष्ट्राची निराशा करणारा अर्थसंकल्प असून या अर्थसंकल्पातून काहीही साध्य होणार नसल्याची टीका राज्याचे अन्न,’ नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केली. केंद्रीय अर्थसंकल्पाबाबत ते एका मराठी वृत्तवाहिनीला मुलाखत देताना बोलत होते.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, ‘मोठे आकडे टाकून लोकांना भुलभुलय्या दाखवायचा अस केंद्राच बजेट असून लोकांना आणी राज्य सरकारला स्वतःच्या हिमतीवर उभं रहावं लागणार अशी परिस्थिती आहे. एकीकडे देशाचा जीडीपी खाली जातोय असे अर्थतज्ञ सांगत असतांना हे मात्र वाढणार असे सांगताय,’ असे भुजबळ म्हणाले.
तसेच पुढे बोलताना भुजबळ म्हणाले की, ‘देशाच्या मालकीच्या एअर इंडिया सारख्या संस्था एकीकडे विकायला काढल्या जात असतांना आता सर्व सामान्य नागरिकांच्या भरवश्याच्या आणि ‘जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी’ हे बिरूद मिरविणाऱ्या एलआयसी मधील शेअर विकून त्याचे खाजगीकरण केलं जातंय. तसेच त्यामुळे आता पैसे मिळण्याचा भरोसा गेला असून लोकांनी विश्वास तरी कोणावर ठेवावा असा प्रश्न आहे, असे भुजबळ म्हणाले.
दरम्यान, केंद्रीय अर्थसंकल्पावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘ ‘मोदी सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प हा देशाच्या विकासाचं इंजिन असलेल्या मुंबई आणि महाराष्ट्रावर अन्याय करणारा आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. तसेच पर्यटन क्षेत्रात मोठ्या रोजगाराची संधी उपलब्ध आहे, मात्र त्यासाठी अत्यंत कमी तरतूद करण्यात आली आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.