आयुष्मानच्या आवाजातील शुभ मंगल ज्यादा सावधानमधील नवीन गाणे रिलीज

frame आयुष्मानच्या आवाजातील शुभ मंगल ज्यादा सावधानमधील नवीन गाणे रिलीज

Thote Shubham

समलिंगी विषयावर बॉलिवूडमध्ये याआधीही अनेक चित्रपट येऊन गेले, पण त्यांना बॉक्स ऑफिसवर म्हणावे तसे यश मिळाले नाही. त्यातीच एक म्हणजे अभिषेक-जॉन अब्राहमचा ‘दोस्ताना’ या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगले यश मिळाले. पण त्याच्या यशाचे श्रेय केवळ अभिषेक आणि जॉनला न जाता अभिनेत्री प्रियंका चोप्राचा यात मोलाचा वाटा आहे.

 

त्यातच आता दिग्दर्शक हितेश केवल्या पुन्हा थोडे खोडकर आणि मनोरंजक पद्धतीने हा विषय तुमच्यासमोर आणण्यासाठी तयारीत आहे. अभिनेता आयुष्मान खुराना हा विषय तुमच्यासमोर ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’ या चित्रपटातून घेऊन येत आहे. नुकतेच या चित्रपटातील ‘मेरे लिए तुम काफी हो’ हे गाणे रिलीज करण्यात आले आहे.

 

आयुष्मान खुरानाने हे गाणे गायले असून वायु यांनी हे लिहिले आहे. या चित्रपटात आयुष्मानसह जितू के प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. आयुष्मान खुराना या चित्रपटात चक्क राजकुमार रावसोबत रोमांस करताना दिसणार अशी चर्चा कानावर येत होती. पण याआधी राजकुमार राव आणि आयुष्मानने ‘बरेली की बर्फी’ या चित्रपटात एकत्र काम केले होते.

                                                   
https://www.youtube.com/watch?v=5LBB6OV3Ano&feature=emb_title

Find Out More:

Related Articles:

Unable to Load More