या अॅपद्वारे शेतकरी मिळवू शकतात शेतीच्या समस्येविषयी संपुर्ण माहिती
शेतकऱ्यांना असलेल्या शेतीविषयी समस्या, उपकरणे, खत याविषयी अनेक गोष्टींची माहिती ऑनलाईन पद्धतीने मिळवणे सोपे झाले आहे. अनेक अॅपवरून शेतीविषयी सहज मार्गदर्शन मिळते. असेच एक अॅप म्हणजे अॅग्रोस्टार अॅप. अॅग्रोस्टार हे अॅप आता उत्तर प्रदेशमधील शेतकऱ्यांना देखील मार्गदर्शन करणार आहे.
याआधी हे अॅप मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी काम करत होते. या राज्यातील लाखो शेतकऱ्यांनी अॅग्री-डॉक्टरांच्या मदतीने चांगली शेती करण्यात यश मिळवले आहे. शेतकरी अॅग्रीस्टोर अॅपवरून कृषि उत्पादन ऑर्डर करू शकतात व शेतकऱ्यांना या उत्पादनांची घरपोच डिलिव्हरी मिळेल. ज्याचा फायदा शेतकऱ्यांना शेतीसाठी होतो.
या अॅपवरून शेतीसाठी विविध पिकांची बियाणे मागवू शकतात. ज्याचा फायदा उत्पादन वाढवण्यासाठी होतो. अॅग्रोस्टारच्या सल्ल्यानंतर मोठा फायदा झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. अॅग्रोस्टार अॅपवरील कृषि चर्चेच्या माध्यमातून शेतकरी आपल्या राज्यातील इतर शेतकऱ्यांशी पिकांच्या समस्येविषयी चर्चा करू शकतात. एवढेच नाही तर शेतकरी या अॅपवर पिकांच्या लागवडीपासून ते काढणीपर्यंत सर्व माहिती मिळवू शकतात. पिकांच्या सुरक्षेसाठी देखील शेतकरी या अॅपवरून उत्पादन खरेदी करू शकतात. हे अॅप गुगल प्ले स्टोरवर उपलब्ध आहे.