शेतकऱ्यांच्या आशीर्वादाने मंत्री होऊन सेवा केली - सदाभाऊ खोत
नांदेड : घरात कोणताही राजकीय वारसा नसताना शेतकऱ्यांसाठी केलेल्या कामांमुळे आणि त्यांच्या आशीर्वादामुळेचं मी मंत्री होऊ शकलो. मंत्रिपदाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची सेवा केली. राज्याचे माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहे.
नांदेडमधील नायगाव येथे शेतकऱ्यांच्या विविध मागण्या व हक्क मिळवून देण्यासाठी रयत क्रांती संघटना आयोजित भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. सदाभाऊ खोत तसेच शेतकरी नेते यांच्या उपस्थित मोढां मैदान नायगाव येथे हा मेळावा झाला, यावेळी ते बोलत होते.
पुढे सदाभाऊ खोत म्हणाले की, शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव, शेतकऱ्यांचे शेतमालविषयक निर्णय, शेतकऱ्यांचे जिव्हाळाविषयक महत्त्वाचे प्रश्न विधानसभेत व अन्य व्यासपीठावर मांडले. यावेळी शिवभोजन थाळीसह त्यांनी राज्य सरकारच्या अनेक निर्णय व योजनांची खिल्ली उडवत, शेतकऱ्यांच्या मुलांना शैक्षणिक सवलती देऊन त्यांचे जीवनमान उंचावले पाहिजे. तसेच शेतकऱ्यांसाठी आपला संघर्ष चालूच राहील असा निर्धार सदाभाऊ खोत यांनी यावेळी व्यक्त केला. या मेळाव्याला अनेक महिला व शेतकरी बांधव उपस्थित होते.