चाकूर ते नांदेड महामार्गावरील खड्डे बुजवल्याशिवाय मी लातूरला येणार नाही - अशोक चव्हाण

frame चाकूर ते नांदेड महामार्गावरील खड्डे बुजवल्याशिवाय मी लातूरला येणार नाही - अशोक चव्हाण

Thote Shubham

लातूर : चाकूर येथे काँग्रेसच्या वतीने महाविकास आघाडीच्या मंत्र्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण व लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमीत देशमुख यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली.

 

अशोक चव्हाण बोलत असताना म्हणाले की, शिवसेनेसोबत आम्ही सत्तेसाठी गेलो नाही तर भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी गेलो. भाजपने गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्राचे वाटोळे केले व सर्वसामान्य जनतेची फसवणूक केली. त्याचबरोबर मित्र पक्षाशी गद्दारी केली.

 

मला नांदेडवरून चाकूरला येण्यासाठी रस्त्यामध्ये खड्डे असल्याने तीन तास लागले. त्यामुळे चाकूर ते नांदेड महामार्गावरील खड्डे बुजवल्याशिवाय मी चाकूरला पुन्हा येणार नाही. असेही अशोक चव्हाण म्हणाले. तसेच लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमीत देशमुख बोलताना म्हणाले की, अनेकांनी पक्ष सोडले तसा मलाही अनेक वेळा फोन आले. पण मी एकटा न येता सर्वच एकत्र आलो. तसेच चाकूर येथील हिन्दू व मुस्लिम धर्माचे श्रध्दास्थान असलेले हकाना बाबाला पर्यटन स्थळाचा दर्जा देण्याचे आश्वासन पालकमंत्री अमीत देशमुख यांनी दिले.                                                                                                                              

Find Out More:

Related Articles:

Unable to Load More