माझ्या बापाने रक्ताचे पाणी करुन पक्ष वाढवला, गालबोट लावणाऱ्यांना माफी नाही - सुप्रिया सुळे

frame माझ्या बापाने रक्ताचे पाणी करुन पक्ष वाढवला, गालबोट लावणाऱ्यांना माफी नाही - सुप्रिया सुळे

Thote Shubham

औरंगाबाद : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे या सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी कार्यकर्ता मेळावा घेतला. दरम्यान या मेळाव्यात तुफान गोंधळ पाहायला मिळाला. संजय वाकचौरे आणि दत्ता गोर्डे यांच्या समर्थकांनी सुप्रिया सुळेंच्या उपस्थितीतच प्रचंड गोंधळ घातला. संतापलेल्या सुप्रिया सुळे यांनी हा पक्ष माझ्या बापाने रक्त गाळून उभारला आहे. पक्षाला कुणी बदनाम कराल तर गाठ माझ्याशी असा दम दिला.

 

पैठण येथील खासदार सुप्रिया सुळे यांच्या संवाद मेळाव्यात विधानसभा सभेच्या निवडणूकीत माजी आमदार संजय वाघचौरे यांचे तिकीट कापल्यावरुन त्यांच्या समर्थकांनी गोंधळ घातला. यावेळी खासदार सुप्रियाताई सुळे यांनी सभा आटोपती घेतली. माझ्या बापाने रक्ताचे पाणी करुन पक्ष वाढवला आहे. याचे भान कार्यकर्त्यांनी ठेवावे. पक्षाला गालबोट लावणाऱ्याला माफ करणार नाही. मी शरद पवारांची लेक आहे. माझ्या बैठकीत पहिल्यांदा असा गोधंळ झाला. ही बैठक माझासाठी कायम अविस्मरणीय राहील. असा सनसनीत टोला यावेळी गोंधळ घालणाऱ्या व त्यांना फुस लावणाऱ्या नेत्यांना लगावला.

                                                                                                                                            

Find Out More:

Related Articles:

Unable to Load More