महिलांवरील अत्याचाराच्या सर्वाधिक घटना भाजपच्या कार्यकाळात - रूपाली चाकणकर

frame महिलांवरील अत्याचाराच्या सर्वाधिक घटना भाजपच्या कार्यकाळात - रूपाली चाकणकर

Thote Shubham

परभणी : अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजप आमदार विधान भवनात आंदोलन करत होती, घसा कोरडा पडेपर्यंत महिला अत्याचारावर घोषणा देत होती. ते आंदोलन पाहून हसावे का रडावे असा प्रश्न पडत होता. कारण गेली पाच वर्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडेच गृहमंत्रीपदी असताना सर्वाधिक बलात्कार व अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत.  राज्यात तब्बल 31 हजार 126 बलात्काराच्या घटना घडल्या असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणतीच भूमिका घेतली नाही.

 

त्याचबरोबर आत्ताच भाजपच्या आमदारावर त्यांच्याच नगरसेविकेने लैंगिक अत्याचार तक्रार दाखल केली असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी लगावला. परभणी येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला संवाद कार्यक्रमानिमित्त त्या बोलत होत्या. यावेळी माजी मंत्री फौजिया खान जिल्हाध्यक्ष भावना नखाते शहर जिल्हाध्यक्ष नंदा राठोड यांची उपस्थिती होती.                                                                                                                                                               

 

 

Find Out More:

Related Articles:

Unable to Load More