राजकारणात मी अपघाताने आलो, महाराष्ट्रात जे काही घडलय ते दुर्देवी - राज ठाकरे

frame राजकारणात मी अपघाताने आलो, महाराष्ट्रात जे काही घडलय ते दुर्देवी - राज ठाकरे

Thote Shubham

मुंबई :  सध्याचं राजकारण हे बटबटीत आहे म्हणण्यापेक्षा ते विचित्र आहे, असं म्हणावं लागेल. कारण सध्या एकासोबत निवडणुका लढवायच्या दुसऱ्यासोबत सत्ता स्थापन करायची आणि सर्वाधिक आमदार असलेल्या पक्षाने विरोधी पक्षात बसायचं. हे दुर्देवी आहे, अशी अप्रत्यक्ष टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेनेवर केली. या कार्यक्रमात त्यांनी ही टीका केली. पुढे बोलताना ते म्हणाले की, राजकारणात मी अपघाताने आलो, महाराष्ट्रात जे काही घडलय ते दुर्देवी, कोण निवडणूक लढवतं, कोण जिंकतय, कोण सरकार स्थापन करत आहे.

 

महाराष्ट्रात जे काही सुरु आहे ते राज्यासाठी चांगल चित्र नाही. याचा परिणाम वाईट होतो.  महाराष्ट्राच्या दृष्टीने हे चांगलं नाही. पुढच्या पीढीला आपण काय संदेश देणार आहोत? तसेच 14 वर्षात अख्खं रामायण घडलं, आपल्याकडं मात्र केवळ 14 वर्षात बांद्रा-वरळी सी लिंक बांधला गेला. राज्यातलं सध्याचं सरकार दुर्देवी, सर्वात मोठा पक्ष विरोधी पक्षात बसलाय. माझ्यासाठी राजकारणाचं अर्थ हा निवडणुकीच्या पलीकडे आहे. निवडणुकीच्या पलीकडे महाराष्ट्र बघण्याचा माझा दृष्टीकोन अत्यंत कलात्मक, विदेशातील अनेक गोष्टी महाराष्ट्रात याव्यात, अशी माझी इच्छा आहे. अस ही मत त्यांनी मांडले.

 

1988 ला शरद पवार मुख्यमंत्री झाल्यावर मी त्यांच्यावर एक व्यंगचित्र काढले, दुसरे घेवून गेलो तर संपादकांनी सांगितले की, आता शरद पवारांवर व्यंगचित्र नको.. तो माझ्या नोकरीचा शेवटचा दिवस होता. अस मत त्यांनी मांडले. तसेच राजकारणात काही कार्टून काढण्यासारखे काही चेहरे आहेत. जसे अमित शहा, मोदी, सोनिया गांधी आणि महाराष्ट्रात उद्धव ठाकरे आणि शरद पवार साहेबांचे चेहरे कार्टून काढण्यासारखे आहेत. 

 

तुम्हाला महाराष्ट्रात आणि देशात आता कोणते चेहरे व्यंगचित्र काढण्यासाठी चांगले वाटतात?' असा प्रश्न राज ठाकरे यांना विचारण्यात आला होता. त्यावर बोलताना राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे व्यंगचित्रासाठी चांगेल असल्याचं म्हटलं आहे.

Find Out More:

Related Articles:

Unable to Load More