उद्धव ठाकरे उद्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून जाणार अयोध्येला

frame उद्धव ठाकरे उद्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून जाणार अयोध्येला

Thote Shubham

मुंबई – उद्या प्रभू श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अयोध्येला जाणार आहे. शनिवारी ठाकरे सरकारला 100 दिवस पूर्ण होत असल्यामुळे अयोध्येला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे जाणार आहेत. त्यांच्या सोबत यावेळी आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे आणि काही नेते मंडळीही असतील, अशी माहिती खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

 

अयोध्येतील उद्धव ठाकरे यांचे आगमन महत्त्वाचे आहे. महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री रामलल्लाच्या कृपेने विराजमान झाला आहे. आम्हाला हा मिळालेला प्रसाद असल्याचे आम्ही मानतो. त्यामुळे उद्धव ठाकरे हे उद्या प्रथम लखनौला येतील, त्यानंतर ते अयोध्येला जातील, असे राऊत यावेळी म्हणाले.

 

आमची देशातील सर्वांनी रामाचे दर्शन घ्यावे. अशी इच्छा असल्याचे संजय राऊत म्हणाले. उद्धव ठाकरेंचा कार्यक्रम हा पूर्णपणे धार्मिक कार्यक्रम असेल. यात कोणतेही राजकारण करण्याची गरज नाही. सरकार सरकारच्या जागी आणि आस्था आस्थेच्या जागी आहे. या ठिकाणी काँग्रेसच्या लोकांनेही यावे. ज्या लोकांना आस्था आहे, त्या पक्षाच्या लोकांनीही या ठिकाणी यावे, असे आम्हाला वाटते, असे राऊत यावेळी म्हणाले.

 

उद्या उद्धव ठाकरे हे अयोध्येला जाणार आहेत. ते दुपारी 4 वाजून 30 मिनिटांनी श्रीरामाचे दर्शन घेणार आहेत. तर सायंकाळी 5 वाजून 30 मिनिटांनी ते मुंबईसाठी रवाना होणार आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असल्याने ते तिथे थांबणार नाहीत, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

 

Find Out More:

Related Articles:

Unable to Load More