#Coronavirus : राज्यात १० पॉझिटिव्ह रुग्ण, पण घाबरुन जाण्याच कारण नाही – उद्धव ठाकरे

frame #Coronavirus : राज्यात १० पॉझिटिव्ह रुग्ण, पण घाबरुन जाण्याच कारण नाही – उद्धव ठाकरे

Thote Shubham

मुंबई : ‘आजपर्यंत महाराष्ट्रात कोरोनाचे 10 पॉझिटीव्ह रुग्ण सापडले आहेत. परंतु, या 10 रुग्णांमध्ये कोरोनाचे लक्षणे दिसत नाहीत. कोरोनामुळे घाबरुन जाण्याची आवश्यकता नाही. मात्र, दक्षता घ्यावी,’ असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

 

ते कोरोनाबाबत राज्यातील जनतेला अधिकृत माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद बोलवण्यात आली होती. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे बोलत होते. ते म्हणाले, ‘गर्दी टाळली गेलीच पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत गर्दी होता कामा नये. पुढचे 15 ते 20 दिवस आपल्यासाठी फार महत्त्वाचे आहेत”, असे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

 

ते म्हणाले, ‘राज्यात दहा पॉझिटिव्ह रुग्ण निश्चित झाले आहेत, यांपैकी पुण्यात आठ तर मुंबईत दोन रुग्णांच्या चाचण्या पॉझिटिव्ह आल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्पष्ट केले. असे असले तरी यामुळे घाबरुन जाण्याचे कारण नाही केवळ दक्षता घेणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.

 

दरम्यान, ‘जगभरात कोरोना व्हायरसची दहशत आहे. त्याची वाढ झपाट्याने होत आहे. आपणसुद्धा सावधपणे याची काळजी घेत आहोत. कोरोना बाधित रुग्ण सापडल्याच्या बातम्या समोर येत आहेत. त्यामुळे याबाबत अधिकृत माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद बोलावली आहे,’ अशी माहिती CM ठाकरे यांनी दिली.

                                                              

 

Find Out More:

Related Articles:

Unable to Load More