ब्राह्मण समाजाला दुखावण्याचा माझा अजिबात उद्देश नव्हता – नितीन राऊत

frame ब्राह्मण समाजाला दुखावण्याचा माझा अजिबात उद्देश नव्हता – नितीन राऊत

Thote Shubham

नागपूर : महिला दिनाचे औचित्य साधून फुले, शाहू, आंबेडकर विचारसंवर्धन समितीनं राऊत यांच्या नागरी सत्काराचे आयोजन केले होते. यावेळी सीएए, एनआरसी व एनपीआरला विरोध दर्शवताना राऊत यांनी ब्राह्मणांवर सणसणीत शब्दांत टीका केली होती.

 

‘बामन स्वत: परदेशातून आले आहेत आणि आम्हाला अक्कल शिकवायला लागले आहेत. आमच्याकडं प्रमाणपत्र मागताहेत. हे कदापि खपवून घेणार नाही, असं राऊत म्हणाले होते. भाजप नेत्यांनी राऊत यांच्यावर चौफेर टीका करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

 

याच पार्श्वभूमीवर राऊत यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपल्या वक्तव्याचा खुलासा केला आहे. ट्विटमध्ये ते म्हणतात, ‘काँग्रेस पक्ष ब्राह्मण नव्हे तर चातुर्वर्ण्य आणि मनुवाद मानणाऱ्या ब्राह्मण्यवादी विचारांचा विरोध करतो. काँग्रेस पक्षातर्फे अनेक नेत्यांनी देशाचे नेतृत्व केले. त्यात अनेक ब्राह्मण होते आणि आहेत. पुरोगामी विचारधारा रुजविण्यासाठी अनेक ब्राह्मण नेते अग्रेसर होते आणि आहेत. त्यांचा आम्हाला अभिमान आहे, असं राऊत म्हणाले.

 

दरम्यान, पुढे ट्विटमध्ये ते म्हणतात, ‘माझ्या वक्तव्याचा रोख मनुवाद पाळणाऱ्या संघाकडे होता. त्याच उद्देशानं मी वक्तव्य केलं होतं. ब्राह्मणांना दुखावण्याचा माझा किंचितही उद्देश नव्हता. कुणी गैरसमज करून घेऊ नये,’ अशी विनंती नितीन राऊत यांनी ट्विटच्या माध्यमांतून केली आहे.

 
 

Find Out More:

Related Articles:

Unable to Load More