बिनधास्त खा चिकन मटन मासे - मुख्यमंत्र्यांची फेसबुक पोस्ट
मुंबई – मागील काही दिवसांपासून सोशल मीडियामध्ये मांसाहार केल्याने कोरोनाची लागण होते, अशी अफवा व्हायरल होत आहे. पोल्ट्री व्यावसायिकांचे या अफवेमुळे प्रचंड मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून चिकनचे दर गेल्या काही दिवसांत प्रचंड घसरले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याच पार्श्वभूमीवर फेसबुक पोस्ट लिहून बिनधास्त चिकन मटन मांसे खा आणि तंदुरूस्त रहा. चिकन खाल्ल्याने कोरोनाची लागण होत नसल्याचे म्हटले आहे.
गेले काही दिवस पोल्ट्री व्यावसायिकांना अतिशय कठीण परिस्थितीतून जावे लागले आहे. चिकन खाल्ल्याने कोरोना होतो, ही अफवा फेसबुक आणि व्हॉट्अॅपच्या माध्यमातून व्हायरल होत असल्यामुळे त्यामुळे गेले काही दिवसांपासून देशभरासह राज्यातील ग्राहकांनी चिकन खाणे बंद केले आहेत. त्यामुळे साहजिकच चिकनचे भाव उतरले आहेत. काही पोल्ट्री व्यावसायिकांनी तर कोंबड्यांची पिल्ले मारून टाकली आहेत.
आज शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या तर्फे राज्याच्या जनतेला मुख्यमंत्र्यांनी आवाहन केले आहे की कोरोनाचा प्रादुर्भाव कुक्कुट पक्ष्यांचे मांस अंडी किंवा मासे खाल्ल्याने होत नाही. याउलट याचे सेवन नाही केल तर प्रथिनांची कमतरता जाणवू शकते, असे त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.