पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून जनता कर्फ्यूची घोषणा

Thote Shubham

नवी दिल्ली :  कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्यूची मागणी तमाम देशवासियांकडे केली आहे. देशवासियांना संबोधित करतांना मोदींनी म्हंटल आहे की जनता कर्फ्यू म्हणजे स्वतःच्या सुरक्षेसाठी आपण स्वतः ने स्वतः वर घातलेली बंधने याचे पालन प्रत्येक नागरिकाने केले पाहिजे.

 

तसेच  देशातील नागरिकांना 22 मार्चला सकाळी 7 वाजेपासून रात्री 9 वाजेपर्यंत  घराबाहेर न पडण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले आहे. त्याचप्रमाणे  नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या किराणा सामानाचा  साठा करू नये. जेणेकरून जीवनाश्यक वस्तूचा तुटवडा पडेल असं आवाहन देखील मोदींनी केलं आहे. 

 

तसेच या कर्फ्यूमधून अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आले आहे. हा आदेश राज्य सरकारनेही पाळावा असं मोदींनी म्हंटले आहे. जनतेला संबोधित करतांना नरेंद्र मोदी सुरूवातीलाच असे म्हणाले की मी 130 कोटी भारतीयांकडे काहीतरी मागायला आलो आहे. कोरोना व्हायरसवर अद्यापही कोणतेही लस, औषध शोधण्यास यश आले नाही. त्यामुळे नागरिकांची चिंता वाढणे स्वाभाविकच आहे. तसेच ज्या देशामध्ये कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. त्या ठिकाणच्या नागरिकांवर मोठं संकट ओढवलं आहे. भारत सरकार या परिस्थितीवर नजर ठेवून आहे.

 

आपला देश हा विकासासाठी प्रयत्न करत आहेत तसेच आपण काही साधंसुधं नाही आहोत असंही मोदींनी म्हंटल आहे. कोरोना व्हायरस बाबत प्रत्येकाने संयम ठेवला पाहिजेत. तसेच संकल्प केला पाहिजे त्याकरिता आपण केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या आदेशाचे पालन केले पाहिजे. कोरोना नावाचे संकट एकढे मोठे आहे की त्याने संपुर्ण जगाला व्यापून टाकले आहे. मोदी बोलतांना असेही म्हणाले की पहिल्या आणि दुसऱ्या महायुध्दादरम्यान जगातल्या देशावर एवढा परिणाम झाला नव्हता जेवढा कोरोना व्हायरसमुळे होत आहे.

 

गेल्या दोन महिन्यापासून आपण कोरोना व्हायरसबाबत मोठ्या बातम्या ऐकत आहोत. भारतीयांनी कोरोनाचा सामना चांगल्या प्रकारे केला त्याचे मला कौतुक आहे असं देखील मोदींनी म्हंटल आहे. तसेच जागतीक महामारी असलेल्या कोरोना व्हायरबाबत आपण गाफील होता कामा नये. कोरोनाचा सामना करण्यासाठी आपण सज्ज राहण्याचं देखील मोदींनी म्हंटल आहे. 

Find Out More:

Related Articles: