“मला डाऊट होताच यांना मी प्लॅटफॉर्मवर पेटी वाजवताना पाहिलं होतं” - निलेश राणे
घरात बसून त्यांनी हार्मोनिअम वाजवतानाचा एक व्हिडीओ त्यांनी शेअर केला होता. या व्हिडीओवरून भाजप नेते निलेश राणे यांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. राऊत यांच्या पेटीवादनाचा खालच्या पातळीवर जाऊन समाचार घेतला. निलेश राणे यांच्या डोक्यात गेलेल्य काही नेत्यांत राऊत यांचा वरचा क्रमांक आहे. त्यामुळे “आईशपथ मला डाऊट होता संज्याला मी चर्चगेट स्टेशन प्लॅटफॉर्मवर पेटी वाजवताना फाटक्या कपड्यात बघितलं होतं. आज खात्री झाली,” अशा शब्दात त्यांनी राऊत यांच्यावर टीका केली आहे. यापूर्वीही निलेश राणे यांनी शिवसेनेवर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही. यावेळीही त्यांनी पेटीवादनावरूनही असेच खालच्या पातळीवरचे मत नोंदवले. राऊतांच्या अशा कृतीलाही राणे यांनी घेतलेला हा आक्षेप अत्यंत निंदनीय आहे. मात्र दुसरीकडे नेटकऱ्यांनी राऊतांच्या पेटीवादनाचे कौतुक केले आहे. आजकालची पिढी मोबाईलशिवाय राहू शकत नाही. मात्र राऊत यांनी चांगला छंद जोपासला, असे मत व्यक्त केले.