
अवधूत वाघांवर बहुतेक कोरोनाच्या धास्तीने परिणाम झालायं – अमोल मिटकरी
‘जगभरातील कोरोना व्हायरस प्रादुर्भावाचा विचार करता, देशातील लॉकडाऊन हे आधीच जाहीर करायला हवे होते. लॉकडाऊन रात्री 8 वाजता जाहीर करायला लॉकडाऊन म्हणजे काय नोटबंदी नव्हे. सकाळी या गोष्टी जाहीर करून जनतेला तयारीसाठी वेळ द्यायला हवा होता.’ अस जयंत पाटील त्यावेळी म्हणाले होते. मात्र त्यानंतर सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे कोरोना बधितांची संख्या वाढल्याने भाजप प्रवक्ते अवधूत वाघ यांनी इस्लामपूर येथे कोरोनाची लागण मोदींवर टीका केल्याने झाल्याचा जावई शोध लावला होता. आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी अवधूत वाघ यांच्या याच वाचाळ टीकेचा समाचार जोरदार समाचार घेतला आहे. ‘बेताल पणा व असंवेदशिलतेचा कळस.. कोरोनाच्या धास्तीने बहुतेक परिणाम झालाय..अशा प्रवृत्तीचा निषेध l वाघ की…. ???’ असं ट्विट करत मिटकरी यांनी अवधूत वाघ यांना चानाग्ल्च झापलं आहे.
https://mobile.twitter.com/amolmitkari22/status/1244625807793938432?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1244625807793938432&ref_url=https%3A%2F%2Fmaharashtradesha.com%2Famol-mitkari-criticize-avdhut-wagh%2F