मुसलमानांमधील काही अवलादी आहेत त्यांना आत्ताच ठेचले पाहिजे – राज ठाकरे
मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिल्लीमधील निझामुद्दीन येथील तबलिगी मरकजच्या कार्यक्रमावर बोलताना संताप व्यक्त केला आहे. मरकजच्या सदस्यांकडून रुग्णालयात डॉक्टरांना दिल्या जाणाऱ्या असभ्य वागणुकीवर बोलताना मरकजच्या लोकांना गोळ्या घालून ठार मारले पाहिजे असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.
मुसलमानांमधील काही अवलादी आहेत त्यांना आत्ताच ठेचले पाहिजे, असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे. त्याचबरोबर निवडणुकीच्या काळात कुणाला मतदान करावे सांगायला येणारे मुल्ला मौलवी आता कुठे गेले आहेत ? अशी विचारणाही यावेळी त्यांनी केली. राज ठाकरे आपल्या कृष्णकुंज निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
निजामुद्दीन येथील तबलिगी मरकजच्या कार्यक्रमावर बोलताना राज ठाकरे यांनी मरकजच्या लोकांना गोळ्या घालून ठार मारले पाहिजे. वेगळा विभाग यांच्यासाठी उभा करावा आणि त्यांचे वैद्यकीय उपचार बंद करायला हवे. या दिवसांमध्येही त्यांना देशापेक्षा धर्म मोठा वाटत असेल आणि आम्ही देश संपवू असे कारस्थान करायचे असेल तर यांना वेळीच ठेचले पाहिजे.
त्यातील काही महाभाग नोटांना थुंकी लावत आहेत, भाज्यांवर थुंकत आहेत. नर्सेसमोर नग्न फिरत आहेत. या लोकांना फोडून काढतानाचे व्हिडीओ व्हायरल व्हायला हवेत तर लोकांना विश्वास बसेल. याबद्दल पंतप्रधानांनी बोलायला पाहिजे, असे म्हटले आहे. तसेच धर्म वैगेरे गोष्टी बोलायची ही वेळ नाही. पण मुसलमानांमधील अशा काही अवलादी आहेत त्यांना आत्ताच ठेचले पाहिजे. लॉकडाउन आत्ता आहे, नंतर आम्ही आहोतच असेही राज ठाकरेंनी म्हटले आहे.