मोदींनी दिले 'लॉकडाऊन' वाढवणार नसल्याचे संकेत

Thote Shubham
नवी दिल्ली : कोरोना व्हायरसची खबरदारी म्हणून देशात 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन पुकारण्यात आले आहे. मात्र हा लॉकडाऊन 14 एप्रिलपर्यंतच असेल की तो पुढे वाढवला जाईल याचा प्रश्न देशातील सर्व नागरिकांनी पडत आहे. तुर्तास तरी लॉकडाऊन वाढणार नसल्याचे संकेत पंतप्रधान नरेंद्र मोंदी यांनी दिले आहे.

कोरोनामुळे संपुर्ण देश लॉकडाऊन करण्यात आल्याने देशातील उद्योगधंदे ठप्प झाले आहेत. हातावरचे पोट असलेल्या कामगारांवर उपासमारीचं संकट येऊन ठेपलं आहे. त्याचप्रमाणे छोटे उद्योगधंदे करणारे व्यापारी रस्त्यावर आले आहेत.


मात्र असे असले तरी केंद्र सरकार आणि राज्य सरकार त्यांच्यासाठी काही ना काही उपाययोजना करत आहेत. त्यामुळे आता कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन संपल्यानंतर दहा मोठ्या निर्णयासह तयार राहा अशा सुचना पंतप्रधानांनी आपल्या मंत्रीमंडळाला दिल्या आहेत.

पंतप्रधानाच्या या दहा निर्णयामुळे 14 एप्रिलनंतर लॉकडाऊन पुढे ढकलल्या जाणार नसल्याचे संकेत मिळत आहे. कोरोना संबधित आज केंद्रीय मंत्रीमंडळाची बैठक पार पडली या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्र्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. या संवादात त्यांनी मंत्र्यांना दहा निर्णयासह तयार राहा असे म्हंटले आहे.

https://mobile.twitter.com/ANI/status/1247107042193661953?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1247108981031604224&ref_url=https%3A%2F%2Famnews.live%2F

Find Out More:

Related Articles: